कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

मोकळ भाजणी:

कोकणातल्या बहुतेक घरात होणारा झटपट आणि अतिशय चविष्ट, खमंग असा सोपा नाश्ता.. तसे आपल्या भागात होणारे पदार्थ कमी साहित्यात झटपट होतात... करत नसाल तर एकदा नक्की करून पहा!



साहित्य:
दोन कप थालीपीठ भाजणी, दोन कांदे, एक टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून मीठ, तेल दोन टेबलस्पून, मोहोरी पाव टीस्पून, हिंग अर्धा टीस्पून, पाणी, ओलं खोबरं, कोथिंबीर

कृती:
कांदा सोलून बारीक चिरा. भाजणीत तिखट, मीठ  घालून थालिपीठापेक्षा थोडी सैल  भिजवा. कढई तापत ठेवा. तेल घाला, ते तापलं की मोहोरी घाला. मोहोरी तडतडली की कांदा घालून मऊ होईपर्यंत परता. आता हिंग, हळद घालून परता. भिजवलेलं पीठ फोडणीत घाला, गॅस बारीक करून झाकण ठेवा, अधूनमधून ढवळत पीठ शिजून मोकळं झालं की गॅस बंद करा. गरमागरम मोकळ भाजणीचा ओलं खोबरं, बारीक चिरून कोथिंबीर घालून आस्वाद घ्या.
टीप: यात पाण्यासोबत थोडं ताक घालून आणखी छान लागते.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा